आमदार मोनिका राजळे पाथर्डी शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज करणार
September 17, 2025
0
आमदार मोनिका राजळे(दि.१८) रोजी पाथर्डी व शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. दोन्ही तालुक्यात झालेल्या ढगफुटी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती, पिके, रस्ते, पुल, बंधारे, तलाव, घरे, पशुधन, विद्युत कामे, गायगोटे, स्मशानभूमीसह मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची शासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून संबंधितांना सुचना देण्यात येणार आहेत. त्यांच्यासोबत महसूल विभाग, कृषी, महावितरण, लघु पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पाहणी दरम्यान नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहेत. आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या शेती व शेती पिके, पशुधन, संसार उपयोगी वस्तू या सर्वांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
