Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

पाथर्डी- शेवगावला भेट; शेतकऱ्यांना धीर!अतिवृष्टी झालेल्या भागात सरसकट पंचनामे करा – मंत्री राधाकृष्ण विखेंच्या प्रशासनाला सूचना


पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. यावेळी पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, घटना अत्यंत दुर्दैवी असून देशभर पावसामुळे असे प्रलय आपण पाहिले आहेत. गेल्या शंभर वर्षांमध्ये देखील असा पाऊस झाला नाही, असा पाऊस हा करंजी या गावात झाला. 

तलाव फुटून रस्ते वाहून गेले. पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केले त्याचा मोठा परिणाम नागरिकांच्या घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी हे शिरले आहे. दरम्यान शासन स्तरावरती आपण पंचनामे करण्याचे सूचना दिल्या आहे. सुदैवाने कुठे जीवित हानी झाली नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

तसेच पुढे बोलताना मंत्री विखे म्हणाले की, दोन दिवसापासून झालेल्या या नुकसानीमुळे शासन स्तरावर ज्या ठिकाणी अतिवृष्टी  झालेली नाही. त्या ठिकाणचे कर्मचारी या बाधितग्रस्त भागांमध्ये बोलून तातडीने पंचनामे करण्यात यावे. तसेच अनेक ठिकाणी शेतांमध्ये थेट पाणी असल्यामुळे पंचनामे करण्यास अडचण आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे.

या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल एक लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेले आहे. या भागांमध्ये झालेले नुकसान पाहता एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत दिली जाईल. नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली जाती पंचनामे केली जाते. मात्र, त्यांना मदत मिळाली जात नाही, असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला होता. यावरती उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, यापूर्वी अकोळनेर तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे जे नुकसान झाले, त्या ठिकाणचे पंचनामे होऊन त्या ठिकाणी मदतही जाहीर झाली. मात्र, विरोधकांचे कामच आहे, आरोप करणे. त्यामुळे त्यांच्याकडे फारच लक्ष देत नाही. शासनाचं काम आहे, लोकांना मदत करणं त्याला आम्ही प्राधान्य देतो, अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी निलेश लंके यांना शाब्दिक टोला लगावला.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे. यावरती बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, या नुकसानग्रस्त नागरिकांना आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून काही घर उभारणीसाठी रक्कम देऊ शकतो का? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. तसेच टेम्प्रेरी तात्पुरत्या स्वरूपाचे शेड, तसेच शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांचे स्थलांतर करत आहोत. तसेच साईबाबा संस्थानच्या माध्यमातून जे नुकसानग्रस्त झालेले नागरिक आहेत, त्यांना फूड पॅकेज उपलब्ध करून देता येईल. याबाबत देखील आम्ही विचार करत आहोत, असे देखील यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.