पुणे येथील प्रसिद्ध अभिनेता व पत्रकार राम विठ्ठल दूधभाते यांना देश भक्ती वर आधारित असलेला "खाकी लय भारी " या मराठी चित्रपटांमध्ये आमदारांच्या भूमिकेमध्ये संधी मिळाली आहे. रावसाहेब मोहिते हे , जनतेचे आमदार कॅरेक्टर करणार आहेत . आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या आदरणीय भावनेतून त्यांनी पत्रकारिता चालू केली , त्याचबरोबर आपला छंद ,अभिनयाची आवड त्यांनी जोपासली आहे. व विविध मराठी सिरीयल वेब सिरीज मध्ये त्यांनी भूमिका केली आहे .
यांची दखल घेत त्यांना नागेश फिल्म प्रोडक्शन निर्मित, मुंबई जगदंबा फिल्म प्रोडक्शन सहनिर्मित "खाकी लय भारी" या मराठी चित्रपटामध्ये रावसाहेब मोहिते जनतेचा आमदार, दिलदार आमदार ही भूमिका कॅरेक्टर त्यांना देण्यात आले आहे. व त्यांनी ही भूमिका स्वीकारली आहे. व त्यांच्या या निवडीचे मराठी हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये अभिनंदन व स्वांगत होत आहे.
पुणे मधील मित्र मंडळी , फॅन फॉलोवर्स वाढला आहे, प्रेक्षक आमच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी सांगितले की, भूमिका छोटी असो , किंवा मोठी परंतु ती चांगल्या प्रकारे उठवली परफॉर्मस केला पाहिजे.चांगली भूमिका नेहमी प्रेक्षकांच्या लक्षांत राहते. व रोल भूमिकेची चर्चा होते.देशभक्ती वरती, देशाच्या गद्दारांना ठोकणार... या कॅच लाईन खाली दिग्दर्शक पांडुरंग गोरे "खाकी लय भारी" या मराठी चित्रपटाची नुकतीचं घोषणा करण्यांत आली आहे.
अभिनेता राम विठ्ठल दूधभाते यांना तिरंगा फिल्मचे सेलिब्रिटी मोठा खलनायक दीपकजी शिर्के यांच्यासोबत प्रथमचं भूमिका करण्याची संधी, चान्स मिळाला आहे. आपण या संधीचे नक्की सोनं करणार आहे. त्यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे उर्फ टायगर पांडे यांचे आभार मानले आहे. व त्यांनी मला सुवर्ण संधी दिली आहे.
लवकरचं या मराठी चित्रपटाचे पुढिल शूटिंग पैठण, मुंगी व छ. संभाजीनगर, पुणे , बीड.परिसरात लागणार आहे व हा नवीन मराठी "खाकी लय भारी" चित्रपट , नवीन वर्षा मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होणार आहे. या चित्रपटाकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
