शेवगाव तालुक्यातील आधोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकाच वेळी तीन शिक्षकांची बदली झाली. आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना निरोप देण्यात आला या निमित्ताने शाळेत छोटेखानी निरोप समारंभ घेण्यात आला. तर बदली प्रक्रियेतून नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.
बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देण्यासाठी कुशाबा पलाटे,विस्तार अधिकारी गाडेकर, ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब पोटभरे, उद्धव बर्डे, ग्रामसेवक बर्डे,नवनाथ तांबे, नितीन खंडागळे, भारत लांडे (जनशक्ती विकास आघाडी सचिव), लहू पोटभरे, नवनाथ तांबे, दीपक गाडे, बाळू लांडे, अरुण खंडागळे, अंगणवाडी सेविका पुष्पा पोटभरे, मनीषा लांडे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले श्री.रवींद्र राठोड, श्री.विष्णू नरोटे, श्री.पोपट होन यांनी शाळेच्या शैक्षणिक उन्नतीत विविध उपक्रमाच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे शाळेतील शैक्षणिक दर्जा उंचावणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सांस्कृतिक उपक्रम क्रीडा स्पर्धा यामध्ये त्यांनी दिलेले योगदान लक्षणीय आहे त्यांच्या मेहनतीमुळेच शाळेचे यश हे सातत्याने घवघवीत ठरले आहे त्यांच्यामुळेच आधोडीची शाळा एक आदर्श ठरली आहे. असे मत भारत लांडे यांनी व्यक्त केले.
निरोप समारंभात शाळेमध्ये नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले यामध्ये श्री.अशोक फुंदे, श्री.राजू साळवे या शिक्षकांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उद्धव बर्डे यांनी शाळेच्या यशात प्रत्येक शिक्षकाचा असलेला वाटा अधोरेखित करत नवीन शिक्षकांनीही त्याच परंपरेला पुढे नेण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामसेवक बर्डे यांनी शिक्षक समाजातील परिवर्तनकर्ते असल्याचे सांगत सर्वांचे कौतुक केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
