श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभकाळ मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये शिव मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून जातात. शेवगाव तालुक्यातील दिवटे गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या केदारेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील चौथा सोमवार असल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
केदारेश्वर महादेव मंदिरात चौथ्या श्रावणी सोमवारी मोठी यात्रा भरते. श्रावणी सोमवार मुळे भाविक दर्शनासाठी येत होते.केदारेश्वर मंदिर हे धार्मिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.या पवित्र स्थळी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्तांच्या हर हर महादेव च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. केदारेश्वर मंदिरातील भाविकांची गर्दी पाहता या ठिकाणी सोयीसुविधा वाढवल्यास आणखीन भाविक येथील असा अंदाज आहे.
