Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

अशोक आहुजा आणि अरुण मुंढे यांचे मनोमिलन : मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका


भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर तसेच शेवगाव शहर व तालुक्यावर लोकप्रतिनिधींकडून अन्याय होत असून शहर व तालुक्याला कोणी वाली राहीलेला नाही. त्यामुळे आगामी काळात शेवगावचे प्रश्न व मुळ भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपसातील मतभेद विसरुन एकत्र काम कऱण्याचा निर्णय घेतल्याचा माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा व भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान अशोक आहुजा व अरुण मुंढे यांच्या मनोमिलनामुळे शेवगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली असून लोकप्रतिनिधींच्या गटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.



शेवगाव येथे आयोजीत पत्रकार परिषदेत आहुजा म्हणाले की, ज्यांचे पक्षासाठी काही योगदान नाही अशा व्यक्तीला पक्षाचे तालुकाध्यक्ष करण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले. ज्यांनीआपली हयात पक्षासाठी घालवली अशा कार्यकर्त्यांना बाजूला सारुन आपल्या नातेवाईकांना व त्यांच्या बगलबच्यांना संधी देण्याचे काम त्यांनी केले आहे.



शेवगाव शहर व तालुक्यात अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे अनेक जण विस्थापित झाले आहेत. त्यांचे योग्य ते पुनवर्सन करण्याचे काम लोकप्रतिनीधींनी करायला हवे होते. मात्र आम्ही वारंवार मागणी करुनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शहर व तालुक्यातील बाजारपेठ ओस पडली असून या सर्व घटकांना न्याय मिळावा म्हणून सर्व भाजप कार्यकर्त्यांची एकत्र मोट बांधण्याचे काम या पुढील काळात करणार आहोत.


भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे म्हणाले की, आहुजा यांचे भाजपमधील योगदान मोठे आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी स्वत:चे राजकारण सुरक्षीत ठेवण्यासाठी आमच्यात सातत्याने वाद कसे होतील यासाठी खतपाणी घातले. त्यामुळे या पुढील काळात भाजपचे निष्ठावान सर्व कार्यकर्ते तसेच शहर व तालुक्याच्या विकासासाठी इतर पक्षातील विकासाची जाण असणारे नेते यांच्या सहकार्याने पुढील वाटचाल करण्याचा निर्णय आहुजा व मी घेणार आहोत.


पूर्वीच्या काळात कुठलीही सत्ता नसतांना भाजपचे जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समितीचे चार असे सदस्य निवडून येत होते. मात्र २०१४ पासून भाजपचा आमदार असतांना एक ही जागा भाजपची शेवगाव तालुक्यात निवडून आली नाही. कोणी निवडून आलेच तर आपल्याला प्रतिस्पर्धी तयार होईल अशी भिती लोकप्रतिनिधींना सातत्याने वाटत आहे. म्हणून पाडापाडीचे राजकारण त्यांनी पक्षांतर्गत केले. याबाबत भाजप पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांची लवकरच भेट घेवून त्यांना सर्व वस्तुस्थितीत समजावून सांगणार आहोत. असे मुंढे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.