Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ शेवगाव येथे भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईच्या अनुषंगाने भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने बुधवार 21 मे 2025 रोजी शेवगाव येथे भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा पद यात्रेची सुरुवात सकाळी आठ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून होणार आहे. 


पहलगाम येथील भारतीय पर्यटकावर दहशतवादी हल्ला होऊन त्यात 27 निष्पाप पर्यटक मारले गेले. या कृत्यामुळे संपूर्ण भारतात पाकिस्तान व आतंकवादी कृत्याच्या विरोधात तीव्र संतापाची लाट होती. या कृत्याचा बदला म्हणून भारतीय नेतृत्व व लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वी राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळाचा नायनाट करून पाकिस्तानाच्या संरक्षण दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून त्यांचे मोठे नुकसान केले. भारतीय संरक्षण दलाचे या गौरवपूर्ण कामगिरीच्या सनमानार्थ संपूर्ण भारतभर भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. 


ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेत भारतीय लष्कराने आपल्या क्षमतेचे दर्शन घडवीत भारत देश दहशतवादाविरुद्ध किती आक्रमक भूमिका देऊ शकतो असे जगाला दाखवून दिले एक भारतीय म्हणून या तिरंगा पद यात्रेत सहभागी होऊन एकतेचे दर्शन घडवूया आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवूया असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.