शेवगाव मध्ये भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांच्या वंदे मातरम फिटनेस क्लब च्या वतीने देवा भाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये दिली जाणारी मानाच्या गदेचे पूजन सोमवार दि.१९ रोजी करण्यात आले.
यावेळी अहिल्यादेवी नगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने छबू लांडगे पहिलवान यांच्या स्मरणार्थ विजेते मल्लास देण्यात येणार आहे.ती गदा आयोजकांकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी शेवगाव शहरातील खंडोबा नगर या मैदानामध्ये शेवगाव तालुका पंचायत समितीचे मा. उपसभापती अरुण लांडे यांच्या हस्ते या गदेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नंदू मुंढे, विजय देशमुख, मधु कोरडे, फुलचंद रोकडे, एकनाथ कुसळकर, नामदेव लंगोरे, अमोल सागडे, बाळासाहेब कोळगे, राम कोळगे, विलास फाटके, सोमनाथ मोहिते, कडू मगर, नाना देहाडराय, अण्णासाहेब डोके, रमेश जाधव, सालार भाई शेख, अभय पालवे, भाऊ वाघमारे, बाळासाहेब नजन, अजिनाथ मासाळकर, गोपी तिवारी, कानिफ साखरे, अनिकेत ढाकणे, अंकुश कुसळकर, अजय भारस्कर, कमलेश गांधी, बाळासाहेब खोटाड, सरपंच पप्पू केदार, राजू तिवारी, जय किसन बलदवा, विनायक खेडकर, अमोल भोकरे, सोमनाथ लोखंडे, छगनराव पानसरे, वाकडे सर, रामभाऊ लोडे, नाना डोंगरे, किरण कोमकर, वैभव लांडगे इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
