जगन्नाथ भाऊसाहेब गरड यांनी (दि. 11) शुक्रवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पांडुरंग श्रीधर कोरडे रा. शेकटे बु, ता. शेवगाव व इतर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. पांडुरंग श्रीधर कोरडे हा गावातील लोकांना त्रास देण्याचा वारंवार प्रयत्न करत असून गावातील विकास कामात तसेच प्रशासकीय अधिकारी, प्रतिष्ठित व्यक्तींना खंडणी मागण्याचा प्रयत्न तो नेहमी करत असतो.
विकास कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक कार्यक्रम, सप्ताह, जयंती उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमात कायम वाद घालून अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे कृत्य करून गावाला तो वेठीस धरत आहे. खंडणी मागणे, ब्लॅकमेलिंग करून पैसा गोळा करणे अशा विविध गुन्हेगारी विषयावर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन सादर करण्यात आले.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यालय कामामध्ये दहा हजार रुपये मागणे, त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. दलित वस्ती सिमेंट काँक्रीट रस्ते यांच्यामध्ये विष्णू कांबळे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये पैशाची मागणी करणे, गावातील दलित वस्ती सोलर हाय मॅक्स कामामध्ये पैशाची मागणी करणे, शाळेतील अंगणवाडी शौचालयाच्या कामांमध्ये पैशाची मागणी करणे, गावामध्ये पेविंग ब्लॉक बसवताना तक्रार करून पैशाची मागणी करणे, रोजगार हमी अंतर्गत रस्त्याचे काम चालू असताना ते बंद पाडून अर्ज करून पैशाची मागणी करणे, महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये पेविंग ब्लॉगचे काम बंद पडून पैशाची मागणी करणे, असे अनेक प्रकारचे कृत्य करून गावाला त्रास देण्याचे काम करत असतो .
आज ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की आमच्या अर्जाची दखल घेऊन योग्य तो न्याय मिळवून द्यावा व पांडुरंग श्रीधर कोरडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
चौकट
_________________________
पांडुरंग कोरडे हा सांस्कृतिक कार्यक्रम, विकास काम, जयंती उत्सव, पुण्यतिथी अशा विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण करतो आणि गावकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत असतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
जगन्नाथ गरड : सामाजिक कार्यकर्ते
___________________________
