Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला; गाव पुढाऱ्यांनो लागा कामाला ; जिल्ह्यातील १२२३ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर


राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २०२५ ते २०३० या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या १२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी झाल्यापासून विहित काळात सोडतीद्वारे सरपंच पद आरक्षण निश्चिती विहित प्रक्रियेनुसार करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे, राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने गुरुवार दि.१२ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


आगामी पाच वर्षाच्या काळात राज्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.याबाबतची आरक्षण सोडत प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी करून त्याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील एक हजार दोनशे तेवीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाने वर्गवारीनुसार सुचित केले आहे.जिल्ह्यातील बाराशे तेवीस ग्रामपंचायत पैकी अनुसूचित जाती प्रवार्गासाठी १५० असून, त्यातील ७५ सरपंच पदे महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीप्रवर्गसाठी १७९ पदे निश्चित असून त्यापैकी महिलांसाठी ९० जागा आरक्षित असतील.


नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता ३३० सरपंच पदी आरक्षित असून त्यापैकी महिलांसाठी १६५ जागा राखीव असतील. तर जिल्ह्यातील ६२४ ग्रामपंचायतची सरपंच पदे खुल्या प्रवर्गासाठी असून त्यापैकी ३१२ पदे महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.जिल्हाधिकारी डॉ.पंकज यांच्या दिशानिर्देशात जिल्हा प्रशासनातर्फे लवकरच राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संख्येनुसार प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत निघणार आहे.त्याबाबतची रूपरेषा लवकरच स्पष्ट केली जाणार आहे.


९९ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला

जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले आहे. यापैकी ८४ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ २०२४ या वर्षात पूर्ण झाला असून यावर्षी १५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे.या ग्रामपंचायतीची प्रारूप मतदार यादी आधी राज्य निवडणूक आयोगाला व नंतर संबंधित ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी, मंडलाधिकारी,पंचायत समिती व तहसील कार्यालय येथे दि.१९ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यावर हरकती-सूचना सादर करण्याची दि.१९ ते दि.२४ मार्चपर्यंत असून दि.२६ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.