Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शेवगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई;आठ जणांना अटक, १३ लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त


शेवगाव शहरातील क्रांती चौकात केलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता तपासणी मध्ये दोन गावठी कट्टे, दोन देशी बनावटीचे मॅक्झिन, आठ जिवंत काडतुस व अकरा मोबाईल असा तब्बल 13 लाख 35 हजार 400 रुपये किमतीच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शेवगाव पोलिसांनी केली असून अटक केलेल्या व्यक्तींचा हेतु काय होता हे तपासात निष्पन्न होईल मात्र, पोलिसांच्या दमदार कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


गुरुवार दि.३ रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) येथून दोन स्कार्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव येथे येणार असून सदर इसमाकडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.धरमसिंग सुंदरडे, सपोनि. काटे, पोना. आजिनाथ वामन, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे, चा.पो.ना. धायतडक, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोरे व होमगार्ड अमोल काळे यांना पोलीस स्टेशन समोरील क्रांती चौक येथे नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.


 नाकाबंदी करीत असताना पहाटे ५ वाजेच्या सुमारास दोन स्कार्पिओ वाहन (एम एच १६, एबी. 5454) व (एम एच 17, एझेड 4199) हे पैठण ते शेवगाव या रोडने क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलिसांनी दोन्ही वाहने अडवली दोन्ही वाहना पैकी (एम एच 16, ए बी 5454) या वाहनांमध्ये एकूण पाच इसम आढळून आले. वाहनांची झडती घेतली असता वाहनांचे ड्रायव्हर सीटच्या बाजूचे सीट समोरील ड्रायव्हर मध्ये एक गावठी कट्टा, दोन मॅक्झिन व चार जिवंत काडतोस मिळून आले.तर दुसऱ्या स्कार्पिओच्या सीट कव्हर मध्ये एक काळा रंगाची हॅन्ड बॅग मिळून आली. असता त्यामध्ये एक गावठी कट्टा, दोन मॅक्झिन व चार जीवंत काडतोस मिळून आली. पोलिसांनी या गावठी कट्ट्याबाबत चौकशी केली असता वाहनातील इसमांना काहीही माहिती सांगता आले नाही. 


यामुळे त्यांची अंगझडती घेतली असता ११ मोबाईल आढळून आले पोलिसांनी दोन्ही स्कार्पिओसह 70 हजार रुपयाचे दोन गावठी कट्टे, दोन हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे ४ मॅक्झिन, 4500 किमतीचे गावठी कट्टा ठेवण्यासाठीची बॅग, चारशे रुपये किमतीचे आठ जिवंत काडतोस, 52 हजार 500 रुपये किमतीचे 11 मोबाईल असा तब्बल 13 लाख 35 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाला सह मिळून आलेल्या शस्त्रबाबत वाहनातील इसमांना विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. 


तसेच सदर शस्त्र बाळगण्याचा कोणताही वय परवाना त्यांच्याकडे नसलेबाबत सांगितले. त्यामुळे सदर इसमाच्या ताब्यात बेकायदेशीर रित्या शस्त्र मिळून आल्याने अंकुश महादेव धोत्रे (रा. बोरगाव) शेख जलील (रा. मुकुंद नगर) सुलतान शेख (रा. गोविंदपुरा) दीपक गायकवाड (रा. शिवाजीनगर) मुक्तार सय्यद सिकंदर (रा. अहिल्यानगर) पापा भाई बागवान (रा. वेस्टन सिटी श्रीरामपूर) सोहेल कुरेशी (रा. फासेमा हाऊसिंग सोसायटी, श्रीरामपूर) आवेज शेख (रा. मिल्लत नगर, श्रीरामपूर) या आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस नाईक आदिनाथ तुकाराम वामन यांचे फिर्यादी वरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.