शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भगवानगड परिसर 43 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बोधगाव व इतर सात गावे प्रादेशिक पाणी योजना शहरटाकळी व इतर 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अमरापुर ,माळी बाभुळगाव व इतर 50 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे संथ गतीने सुरू आहेत. योजनेतील अडचणी दूर करून कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली. सर्व पाणीपुरवठा योजनांचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रधान सचिव, पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व अधिकार्यासह पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात बैठक पार पडली.
यावेळी योजनेत अपूर्ण पाण्याच्या टाक्या, अपूर्ण पाईपलाईन, जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल वितरण पाईपलाईन याबाबतच्या अडचणी व दिरंगाईबाबत आढावा घेतला. यामध्ये पाण्याच्या टाक्यासाठी शासकीय जागा मिळत नसल्याबाबतची बाब अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सकारात्मकतेने लक्ष घालून सोडवावी तसेच रेट्रो फिटिंगच्या शहर टाकळी व बोधेगाव योजना एप्रिल अखेर पूर्ण करण्याचे आदेश मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याबाबत कामात हलगर्जीपणा झाल्यास अधिकारी व कंत्रातदारांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल. असे स्पष्टपणे सांगितले. आढावा बैठकीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, पाणीपुरवठा प्रधान सचिव संजय खंदारे, सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशांत भामरे, अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे, कार्यकारी अभियंता मृणाल धगधगे, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद हितेंद्र चव्हाण व दूरदृष्टय प्रणाली द्वारे अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
