गोळेगाव ग्रामस्थांचे महिलासह जलसमाधी आंदोलन... पाझर तलावाच्या दुरुस्तीची मागणी
लाडजळगाव प्रतिनिधी :
शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील नागरिकांनी पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी व सिमेंटचे भिंत बांधून उन्हाळ्यात नदी पात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनात टोकाची भूमिका घेतली आहे.
आंदोलनाच्या तीन दिवसानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने ग्रामस्थांनी महिलासह पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात पुरुषा पाठोपाठ महिलांही सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

