Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रयत्नामुळे शेवगाव आगाराला नविन 5 बस

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रथम टप्प्यात शेवगांव आगाराला 5 अशोक लेलँड कंपनीच्या बस शेवगांव आगार येथे दाखल झाल्या आहेत, सदर बस ह्या बी.एस. 6 प्रणालीच्या प्रवाशांसाठी अद्यावत सुख सुविधा असणाऱ्या आहेत. 25 फेब्रुवारी रोजी परिवहन मंत्री सरनाईक यांचेकडे मतदारसंघातील शेवगांव व पाथर्डी आगारसाठी बस मिळणेसाठी पाठपुरावा केला होता. शेवगांव व पाथर्डी आगारासाठी मागणी केलेल्या बससाठी पाठपुरावा चालू असुन परिवहन विभागाला बस उपलब्ध होताच उर्वरित बस आगाराला उपलब्ध होतील असे आमदार मोनिकाताई राजळे यांचेकडून सांगण्यात आले. 

शेवगांव आगारात आज पहाटे पाच बस दाखल झाल्या असुन मान्यवरांचे हस्ते बसचे पुजन करण्यात आले, यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब पाटेकर, पोलिस निरीक्षक समाधान नांगरे, आगार व्यवस्थापक अमोल कोतकर, माजी जिल्हा परिषद अशोकराव आहुजा,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. निरज लांडे, भाजपा शहराध्यक्ष बापु धनवडे, जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर,   शिवाजीराव भिसे, माजी तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, कचरू चोथे, भिमराज सागडे, नगरसेवक गणेश कोरडे, नितीन दहिवाळकर, शिवाजीराव भिसे, संदिप खरड, राजेंद्र डमाळे, केशवराव आंधळे, राजेंद्र घुगरे, महादेव पवार, सुभाषराव बडधे, ज्ञानेश्वर खांबट, सौरभ मुरदारे, अनिल सुपेकर, गोकुळ घनवट सर, ह.भ.प. रामकिसन तापडिया, ह.भ.प. चंद्रशेखर मुरदारे, विनोद शिंदे, सुभाषराव बडधे, संदिप वाणी, एकनाथ खोसे, किरण काथवटे, सुरेश थोरात, नवनाथ आमृत, अमोल माने, तुषार पुरनाळे, अभिनव अंधारे, अमोल घोलप, सतिष म्हस्के, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय अधिकारी संकेत राजहंस, स्थानक प्रमुख किरण शिंदे, सौरभ कवडे, ऋषीकेश सोनवणे, राजेंद्र वडते, स्वप्निल गव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार मोनिका राजळे यांचे मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे माध्यमातुन शेवगांव व पाथर्डी आगाराचे बसस्थानकासाठी निधी उपलब्ध होऊन बसस्थानकाचे काम पुर्ण झालेले आहे. 

शेवगांव व पाथर्डी आगाराच्या बहुतांशी गाड्या नादुरूस्त असल्याने सातत्याने बंद पडत असल्यामुळे आमदार मोनिका राजळे यांनी राज्य परिवहन महामंडळ तसेच शासनाकडे नविन बससाठी मागणी केली होती, तसेच त्या संदर्भात पाठपुरावा करून  विधानसभेतही औचित्याच्या मुद्याद्वारे प्रश्न उपस्थित करून बस मिळण्याबाबत आवाज उठविला होता. यापुढील आगाराचे कामासाठी पाढपुरावा चालू असल्याचे यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते बापुसाहेब पाटेकर यांनी यावेळी सांगितले.


नवीन बसमुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होऊन त्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल, बसस्थानकाचे काम पुर्ण केल्याबद्दल तसेच अद्यायावत सुखसोयींसह पाच बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आगार व्यवस्थापक अमोल कोतकर व कामगार संघटणेचे राजेंद्र घुगरे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.