मागणीच्या तुलनेत यंदा नारळाची आवक कमी झाली आहे. गतवर्षीपेक्षा नारळाचे दर यंदा वाढले आहेत. गतवर्षी वीस रुपयांना मिळणारे नारळ यंदा पंचवीस रुपयांना मिळत आहे. लग्नसमारंभासह, विविध धार्मिक कार्यक्रम, सत्कार समारंभ अशा कार्यक्रमांमध्ये नारळाचा उपयोग केला जात असल्याने नारळाला मागणी वाढली असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून नारळ विक्रीस येतात. काही दिवसापासून त्या भागातच नारळ कमी आहेत. त्याचा परिणाम नारळाची आवक कमी होण्यास झाला आहे. त्याचा परिणाम व्यवसायावरही झाला आहे.
धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, देवदर्शन, सभा, समारंभ, सत्कार, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमासाठी नारळाला मागणी असते. याद्वारे नारळाला मोठी मागणी आहे. दुसरीकडे हवामानातील बदल पावसाचे कमी अधिक प्रमाण कीड रोगांचा प्रादुर्भाव आदि कारणामुळे नारळाचे उत्पादन घटले आहे. परिणामी मालाचा पुरवठा कमी होऊन नारळाच्या दारात वाढ झाली आहे.
